मधुमेहाचे किती प्रकार आहेत?HealthPlanet

Posted on Mon 28th Nov 2022 : 13:30

मधुमेहाचे दोन नव्हे पाच प्रकार?

गेल्या कित्येक वर्षांपासून मधुमेहाचे प्रकार टाइप १ आणि टाइप २ हे दोनच प्रकार असल्याचे सर्वश्रुत होते. मात्र, जगभरात दोनपेक्षा अधिक मधुमेहाचे प्रकार असून दोन नव्हे; तर पाच प्रकार असून त्यामध्ये आजाराची विभागणी केल्यामुळे रुग्णाचा उपचार योग्यरीत्या करणे सोपे झाले आहे

'जगभरातील पंधरा हजार मधुमेहग्रस्त रुग्णांचा अभ्यास केला. जगभरात पाच प्रकारचे मधुमेह आहेत. मधुमेहाची या पाच प्रकारात विभागणी केल्यामुळे प्रत्येक रुग्णाचा उपचार हा योग्यरीत्या करणे सोपे झाले आहे. मधुमेहाच्या प्रकारानुसार रुग्णाला कोणते उपचार, कोणते डाएट व कोणता व्यायाम करावा याचाही अभ्यास यामध्ये केला आहे. पाच प्रकारात टाइप १ मध्ये इन्सुलिनची कमतरता शरिरात असते. टाइप २ मध्ये डोळ्याचे व पायाच्या आजाराची शक्यता जास्त असते. टाइप ३ मध्ये शरीरातील इन्सुलिन नीट काम करत नसल्याने किडनीचे आजार होऊ शकतात. टाइप ४ हा जास्त लठ्ठपणामुळे होतो तर टाइप ५ हा आजार वाढत्या वयामुळे होतो.'

'मधुमेह टाळण्यासाठी उत्तम जेवणाची सवय असणे आवश्यक आहे. यामध्ये कार्बोहायड्रेट्स व ग्लुकोजचे प्रमाण कमी असलेले अन्न खाल्ले पाहिजे. अति गोड खाण्याचे प्रमाण कमी केले पाहिजे. तसेच दिवसाचे जेवणाचे प्रमाण जास्त व रात्रीचे आहार हलका असावा.'

solved 5
wordpress 3 years ago 5 Answer
--------------------------- ---------------------------
+22

Author -> Poster Name

Short info